ad

12.4.11

ते पण एक वय असतं



ते पण एक वय असतं


ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं ...

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं ...

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं ...

ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं ...

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं ...

खालील कविता  वाचनात आली, आवडली. याचे संकलन श्री विलास रबडे यांचे आहे.

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत B.E.ची स्वप्नं पहायचं ...

ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं ...

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं ...

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं ...

ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याच ...

No comments:

Post a Comment

Please put in your comments here आपले मत जरुर येथे लिहा.